Friday, June 28, 2019

आज माझा जन्मदिवस त्या निमित्ताने २ शब्द ..

आज मी जे पण काही आहे ते प्रथमतः माझ्या आई वाडीला मुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्द आणि सत्यनारायण गोयंका यांच्या मुळे खुप कठीन परिस्थिती मध्ये आई वडिलांनी मला शिकवलं, 
माझ्या आयुष्यामध्ये जे काही चढ उतार आले त्याला सामोरे जात आज मी समाधानी जीवन जगत आहे,
भगवान बुध्द म्हणतात आई वडिलांची जीवनभर जरी कुणी सेवा केली तरी त्यांचे उपकार फिटत नसतात.. पण त्यांना धम्मा मध्ये पुष्ट केले तर कुठे थोड्या प्रमाणामध्ये ऋणातून आपण मुक्त होत असतो..
त्या मुळेच मी माझ्या आई वडिलांना इगतपुरी इथे १० दिवशीय विपश्यना शिबिरामध्ये पाठवले.. (कोर्स निःशुल्क असतो.) १० दिवस ध्यान साधना करून त्यांना खुप बरे वाटले.. वडिलांना दारूचे व्यसन होते म्हणुन ते शिबिरास जायला टाळाटाळ करत होते.. कारण तिथे १० दिवस कसलेच व्यसन करायला , पूजा पाठ करायला , बोलायला मनाई असते..
तरी त्यांनी १० दिवस तो कोर्स केला .. नंतर ५, ६ महिन्या साठी व्यसनमुक्त जीवन जगले..
विपश्यनेची खुप मोठी किमया आहे. जगभरात आता पर्यंत लाखो लोकांनी ह्या साधनेमुळे लाभान्वित झालेले आहेत.
विपश्याचार्य गोयंका गुरुजी म्हणतात जर कोणाला अमृत प्राप्त झाले तर त्याला राहवत नाही तो दुसऱ्याला पण असे अमृत मिळावे अशी ओढ लागत असते तसे ह्या विपश्यना साधनेचे आहे. म्हणुन मी ह्या सन्मार्गावर जास्तीत जास्त लोकांना पाठवत असतो.
हजारो लोकांची कत्तल करणारा अंगुलीमाल तो बुध्दांच्या उपदेशाने सुधारला तुम्ही आम्ही तर साधी सरळ माणसे जरी आपल्या हातुन काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर पर्वा नाही.. धम्म सर्वांना सन्मार्गाने जीवन जगण्याची संधी देतो.
आज तुरुंगामध्ये हजारो कैदी ह्या साधनेचा फायदा घेत आहेत.
धरम का मार्ग मंगल का मार्ग
आज आजु बाजुला जाती धर्माच्या नावावर जो काही कहर केला जातोय ते पाहुन मन थक्क होतेय.. डॉ. बाबासाहेब म्हणायचे माणुस धर्मा साठी नसुन धर्म माणसासाठी आहे. तर आज या उलट धर्माच्या नावावर माणसांना मारले जातेय हे पाहुन मन सुन्न होतेय.
म्हणुन आज जर खरी माणसाला कशाची गरज असेल तर ती आहे धम्माची ..
तरी आज ह्या दिवशी आई वडिलांचे, गुरुजनांचे ऋण व्यक्त करणारे गीत , त्यावर मी ४, ५ वर्षा पूर्वी व्हिडिओ slide show बनवला होता तो सोबत attach केला आहे ..
आवडल्यास लाईक करावे...
जय भारत, जय भिम, जय बुध्द
www.brambedkar.in


0 comments:

Post a Comment