Wednesday, May 2, 2018

सैनीका - मराठी कविता

सैनीका,
तू आहेस तर मी आहे
तू नाहीस तर मी ही नाही.
तुझ्या नसा नसात देश रक्षण च आहे
आतिरेक्यांच्या नसा नसात देश भक्षनच आहे.
केंव्हाही तू मरायला तयार असतोस
म्हणुन मी इथे जगायला तयार असतो.
मृत्यू ची तारीख तुला माहीत असते
तरीपण तुला त्याची चिंता नसते.
देशासाठी शहीद होण्याची तुला ओढ लागत असते
म्हणुन तर मला रोज इथे भाकर गोड लगत असते.
रक्षका शिक्षका तुला सलाम करतो मी
देश हीतासाठी लढ़ नारया सैनीका तुला प्रणाम करतो मी.



................... प्रेमजी
(प्रेमसागर गवळी)

0 comments:

Post a Comment